आई-बाबा, मित्रमंडळी, आजूबाजूचे ,
एवढंच काय तर,
आपणही आपल्याला परके वाटायला लागतो.
बाकीच्यांच्या वागण्याचं सोडूनच द्या...
इथे आपल्याच वागण्याची नाही शाश्वती
मग हे असं का ? अशा कधीही उत्तर न सापडणार्या
प्रश्नात खोल खोल रुतणं...
आपलंच बोलणं आणि आपलंच वागणं...
परक्याहून परकं...
बाकीच्यांच्या वागण्याचं मग कशाला कोडं ?
पण... पण परकं होण्याची सवयही परकी झाली तर...
खरंच सगळं आपलंसं वाटायला लागेल ?
पण आत्ता उत्तर नाही मिळणार याचं...
कारण तेही परकं झालंय सध्या...
मस्त! :-) खरच होतं असं अनेकदा!
ReplyDeleteBTW... हे वाचताना एक छानसा शेर आठवला -
खुदकी हालत का एहसास नहीं मुझे,
औरोंसे सुना है परेशान हुं मै।
nice !!!
ReplyDelete