Sunday, February 6, 2011

परकं


कधीकधी सगळंच परकं होतं...
 आई-बाबा, मित्रमंडळी, आजूबाजूचे ,
 एवढंच काय तर,
 आपणही आपल्याला परके वाटायला लागतो.

बाकीच्यांच्या वागण्याचं सोडूनच द्या...
इथे आपल्याच वागण्याची नाही शाश्वती
मग हे असं का ? अशा कधीही उत्तर न सापडणार्या
प्रश्नात खोल खोल रुतणं...

आपलंच बोलणं आणि आपलंच वागणं...
परक्याहून परकं...
बाकीच्यांच्या वागण्याचं मग कशाला कोडं ?

पण... पण परकं होण्याची सवयही परकी झाली तर...
खरंच सगळं आपलंसं वाटायला लागेल ?
पण आत्ता उत्तर नाही मिळणार याचं...
कारण तेही परकं झालंय सध्या...

2 comments:

  1. मस्त! :-) खरच होतं असं अनेकदा!

    BTW... हे वाचताना एक छानसा शेर आठवला -

    खुदकी हालत का एहसास नहीं मुझे,
    औरोंसे सुना है परेशान हुं मै।

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...