Monday, May 9, 2011

लहानपणी जाणवलेली आई....


    तीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे कळण्याचं ते वय नव्हतं... ती थोडा काळ जरी नसली तरी आपलं काय होईल याचा विचारही कधी केला नव्हता... पण तरी शाळेतल्या अजाण वयातही तिच्यावरच्या प्रेमापोटी केलेली ही अल्लड, बालिश कविता...मातृदिनाच्या निमित्ताने...!!!आई ही आई असते
ती खरी किंवा खोटी नसते

चिमण्या पिल्लाला सांभाळायला
ती सदैव दक्ष असते

आई म्हणजे समईतली ज्योत
 अखंड प्रेमाचा झोत
 अडलेल्याचा हात
 तर एकाकीपणाची साथ

आई असते आभाळ
जन्मदात्री धरती
तोच सुखी होईल
ज्याला कळेल तिची महती

आ म्हणजे आत्मा
 ई म्हणजे ईश्वर
सप्तसुरांच्या लयीतला हा एकच अनोखा स्वर
जो कधीही लोप पावत नाही,
सतत कानात किणकिणत राहतो,
           देवळातल्या घंटेसारखा....!


 तिचं अस्तित्व सतत जाणवत राहतं

 सुगंध सतत दरवळत राहतो
 नुकत्याच उमललेल्या,
           मोगर्याच्या फुलासारखा....!
                                                        
                     

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...