
२०११ च्या नवीन दिवसाची सुरुवात करतानाही अशीच काहीशी भावना आहे. आजपासून छोट्या छोट्या आनंदाच्या रोपट्यांना हळूच गोंजारून त्यांना वाढतं करायचंय. कधी विचार करून बघितलाय? या आनंदाच्या रोपट्या न्मधूनच 'आनंदाचं झाड ' जन्माला येतं आणि त्याची बीजंही आपल्यातच लपलेली असतात. कुठेतरी वाचलेलं आठवतंय, 'वेदनेतही आनंद असतो.' ऐकताना जरा विचित्र वाटेल कदाचित. पण बाळंतपनाच्या वेणानंतर जन्माला येणारं इवलं इवलं अर्भक पाहिलं की या वाक्याची सत्यता पटते.
थोडक्यात काय तर, एक आनंदाचा रेशमी धागा पकडून नवीन वर्षाच्या या पाउलवाटेवरून चालत राहायचं. मग वाटेत कितीही अडथळे येवोत , आपल्या हातातला आनंदाचा गर्भरेशमी वीणेचा धागा आणि मनातला आनंदाचं झाड जोपर्यंत बहरलेलं आहे तोपर्यंत ' कशाला उद्याची बात? '..... :) :)
हे मनातला ' आनंदाचं झाड' मनःपूर्वक जपायचं....हाच नव्या वर्षाचा संकल्प...!!!
anandyatri mhanun jagtana jivnachi palkhi khandyavrun vahaychi (ektyanech vahaychi aste) ani aplya janm dindit anek yatri sahbhagi karun ghyayche....hich tar khari aanandyatra....)))
ReplyDelete